संचारबंदी

डाॅ.दिलीप धानके    24-Mar-2020
Total Views |
lockdown_1  H x
 
जगा आली आर्थिक मंदी
कोरोना विषाणू छंदी फंदी
उपाय त्याचा संचारबंदी
सुचना पाळा गर्दी टाळा
वाचवा वृद्ध आणि बाळा
श्वास घ्या घरीच मोकळा
स्वतावर स्वताचीच बंदी।
कोरोना विषाणू छंदी फंदी॥
नको शेकहॅन्ड विदेशी ब्रॅन्ड
हात जोडून नमस्कार अखंड
नकोच शिळे आणि पेय थंड
जागे होतील का मुके नंदी।
कोरोना विषाणू छंदी फंदी॥
नको अफवा आणि भीती
रोकावया या रोगाची गती
रोज स्वच्छता नियम रीती
जागृत मानवा दिलीप वंदी।
आता पाळायचीच संचारबंदी॥