लोक लॉकडाऊन असूनही वासिंदमध्ये नागरीक नियम फाट्यावर मारून मोकाट फीरत आहेत

जनदूत टिम    23-Mar-2020
Total Views |
 
वासिंद : कोरोनाचे वाढते सँक्रमण व प्रादुर्भाव रोखण्यासाठी केँद्र व राज्यसरकार कडून अत्यंत कठोर पावले उचलली जात असताना, मात्र नागरिकांनी आज सकाळी बाजार पेठेत भाजीपाला व किराणा दुकानात तोबा गर्दी करत सर्व शासकीय नियम फाट्यावर मारत असल्याचे दिसून येत आहे.
 
Vasind_1  H x W
 
वासिंद ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंच व सदस्यांनी वासिंद पोलिस ठाण्यात तोंडी तक्रार केल्यावर वासिंद पोलिसांनी त्वरित आपला फोजफाटा घेऊन किराणा दुकान, भाजीपाला व दुध डेरी व मेडिकल दुकानातील व रस्त्यावरील वाढती गर्दि कमी करण्यासाठी धडक कारवाई करून आत्यवश्यक सेवा हि बंद केली.