ही कामे तात्काळ सुरू करणे

जनदूत टिम    23-Mar-2020
Total Views |
आज पासून सर्व तलाठी मंडळ अधिकारी व कोतवाल ग्रामसेवक कृषी सहायक, आरोग्य कर्मचारी डॉक्टर्स यांनी मुख्यालय सोडणेची नाही, व मुख्यालयात ३१/३/२०२०, अनिर्वाय मुक्काम करणेची आहे, गावात समिती खालील प्रमाणे स्थापना करणेची आहे.
१) सरपंच अध्यक्ष
२) तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक पदसिद्द सदस्य
३) ग्रामपंचायत इतर सदस्य हे सदस्य
४) पोलीस पाटील सदस्य सचिव
५) गावातील प्रतिष्ठित वेक्ती सदस्य
६) गावात राहणारे प स /जी प सदस्य हे सदस्य असतील......
 
vegetables_1  H
 
समिती चे कामकाज पुढील प्रमाणे राहील
१) गावातून कोणालाही बाहेर सोडणे नाही व बाहेरून येणाऱ्याला घेणेची नाही
२) यापुर्वी बाहेरून आलेली लोकांना (परदेशी /पुणे व मुंबई)अलगीकरण (घरी बंदिस्त करणे ) खोलीत ठेवून रोज माहिती देणे
३) गावा मध्ये अत्यावश्यक सेवा म्हणजे किराणा माल, दूध, मेडिकल चालू राहतील
४) खानावळ /हॉटेल घर पोहोच सेवा असेल तर चालू ठेवणे
५) भाजीपाला घर पोहच सेवा देणेची वेवस्था करणे
६) हातगाड्या, पानटपरी, कोल्ड्रिंक्स व आयस्क्री दुकान बंध करणे तसेच केशकर्तनालय /सलून दुकान बंध करणे
७) सर्व रेशन दुकान चालू ठेवणे
८) दुध डेअरी वर गर्दी न होता १ मीटर अंतर ठेवून रांगा करून दुध घेणे व देणे ची आहे
९) दुध डेअरी वर हात धुण्याची साबण व डिटर्जेन्ट ठेवण्याची वेवस्था करणे
१०) गावातील सर्व सार्वजनिक जागा उदा सर्व कार्यलय व इमारत १%सोडियम हायपोक्लोराइड सोलुशन ने फवारणी करणे ...... वरील कामकाज तात्काळ सुरु करणेची आहे याची तात्काळ नोंदी घेऊन काम सुरु आत्ता पासून स्वतःहून सुरु करा