भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.मुन्ना साहेब महाडिक यांचा जनता कर्फ्यू व घंटानाद आवाहनाला जाहीर पाठिंबा

जनदूत टिम    23-Mar-2020
Total Views |
सोलापूर : भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी कोरोना वायरचे लढा देण्यासाठी दिनांक २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू आयोजन केले होते. त्याचबरोबर पोलीस प्रशासन सर्व हॉस्पिटॅलिटी व त्या संदर्भात काम करणाऱ्या सर्व परिचारिका व सर्व संबंधित लोकांना समर्थन देण्यासाठी २२ तारखेला थाळी किंवा घंटा वाजवून समर्थन देण्यासाठी पंतप्रधान मोदी जी ने आवाहन केले होते.
 
Munna_1  H x W:
 
त्या आवाहनाला सुद्धा कोल्हापूर करांबरोबरच, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार धनंजय फोटो मुन्ना साहेब महाडिक यांनी सुद्धा समर्थन देऊन या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे तसेच या महाभयंकर अशा 'कोरोनो व्हायरस' बाबत जनजागृती मोहीम उघडली होती या महाभयंकर अशा आजाराबाबत कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नसल्यामुळे हा न होण्यासाठी फक्त प्रतिबंध करणे हाच योग्य पर्याय असल्याचे यावेळी त्यांनी आपल्या जन जागृती मधून सांगितले आहे.
 
धनंजय महाडिक यांनी आपल्या सोशल मीडियाच्या फेसबुक व्हाट्सअप या माध्यमातून सुद्धा सर्वांना याबाबतचे आवाहन केले आहे. या अगोदर सुद्धा परिस्थितीमध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला पाण्याचा विळखा घातलेला असताना मा खा. धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक यांनी आपल्या युवाशक्तीच्या माध्यमातून सर्व कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर इतर सुद्धा ठिकाणी भरघोस अशी मदत केली होती. ३१ मार्च २०२० पर्यंत हा कोरोनो व्हायरसचा विषाणू पसरू नये म्हणून महाराष्ट्र सरकारने आजच सर्व महाराष्ट्रामध्ये लाँक डॉऊन केलेले असताना कोल्हापूर जिल्ह्यात ही याची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल असे मत. खासदार धनंजय महाडिक यांनी काही प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले आहे.