आसनगाव औद्योगिक परिसरातील कारखाने ३१ मार्च पर्यंत बंद - अविनाश चंदे

22 Mar 2020 15:39:34
आसनगाव : कोरोना या विषाणू पासून होणारा आजार रोखण्यासाठी आज शासकीय स्तरावर अनेक उद्योग आस्थापने ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना ह्या आजाराचा पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना सदर आजार गांभीर्याने न घेता आसनगाव औद्योगिक परीसरातील कारखाने बिनबोभाट पणे चालू आहेत. सदर कारखान्यामध्ये मुंबई व मुंबई उपनगरातून कामगार मोठया संख्येने कामाला येत असतात शिवाय अनेक कारखानदारांचे मालक मुंबई व मुंबई उपनगरातील असल्याने आणि कामानिमित्त ते परदेशवारी करत असल्याने या आजाराचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
corona_1  H x W
 
सदर कारखानदारांना ३१ मार्च पर्यंत कारखाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही सदर कारखान्याच्या मालकांनी सदर शासन आदेशाला हरताळ फासला असून आपले कारखाने चालू ठेवले आहेत, अजूनही या कारखान्याच्या मालकांनी या संबंधित सूचना आपल्या कामगारांना दिल्या नसल्यामुळे कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तरीही वरील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण आपल्या स्तरावर संबंधित कारखानदारांना नोटीसा देऊन कारखाने बंद करण्याची कार्यवाही करावी.
Powered By Sangraha 9.0