स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोलापूर जिल्हा संघटक पदी शहाजहानभाई शेख यांची निवड

जनदूत टिम    20-Mar-2020
Total Views |
पंढरपूर : शिरोळ येथे मा.खा.राजु शेट्टी यांच्या निवासस्थानी व त्यांच्या हस्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकारी निवडी संपन्न झाली आहे.यावेळी पंढरपूर तालुक्यातील विविध ठीकाणी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा हाती घेतला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये दाखल झालेले मा.शहाजानभाई शेख यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.राजू शेट्टी यांनी जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली आहे.
 
Raju Shetty_1  
 
यावेळी गादेगावचे कार्यकर्ते मा.धनंजय (आबा) पाटील, मा. रायाप्पा हळणवर, मा. चंद्रकांत मस्के, मा. सोमनाथ सुर्वे,बळिराजाचे माळशिरस ता.अध्यक्ष मा.अजित बोरकर, कांतिलाल(बापु) पाटील,तुकाराम बागल,नितीन पाटील,राजेंद्र बागल,नवलदाजी फाटे, यांनी प्रवेश केला आहे. या सर्वांचे मा.खा. राजु शेट्टी यांनी संघटनेमध्ये स्वागत केले. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की; स्वाभिमानी शेतकरी संघटना ही एक शेतकरी व कष्टकर्यांच्या प्रश्नांसाठी आजपर्यंत उठवत आहे व इथुन पुढेही अशाच प्रकारे आक्रमकपणे आपण सर्वजन लढत राहू आणि शेतकर्यांचे प्रश्न कसे सोडवले जातिल याचा प्रयत्न केला जाईल नविन आलेल्या सहकार्यांनी संघटनेच्या तत्त्वाशी एकनिष्ठ राहुन येत्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना तळागाळात पोहोचवण्याचे काम करावे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
 
यावेळी पुढे बोलताना शहाजहानभाई शेख म्हणाले की; सर्व सोलापूर जिल्ह्यातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवून सर्व गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन अशी ग्वाही यावेळी शहाजहान शेख यांनी दिली. या सर्व निवडी व प्रवेशाप्रसंगी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या बरोबरच सर्व सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी ची टीम यावेळी उपस्थित होते. या निवडी प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.तानाजी बागल,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मा.सचिन पाटील आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.