श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या हंगामाचा सांगता समारंभ

20 Mar 2020 17:33:17

साखर कारखाना जिल्ह्यात आघाडीवर 

सोलापूर : श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०१९-२० यशस्वीपणे पूर्ण करुन या गाळप हंगामाची आदरणीय चेअरमन मा. सुधाकरपंत परिचारक यांचे शुभहस्ते सांगता झाली. कारखान्याचा सांगता समारंभ कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अगदी साध्या पध्दतीने कसलीही गर्दी न करता करण्यात आला.
 
Chairman_1  H x
 
कारखान्याचे व्हा.चेअरमन मा. वसंतराव देशमुख, कार्यकारी संचालक मा. डॉ. यशवंत कुलकर्णी उपस्थित होते. या निमीत्ताने कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंतराव कुलकर्णी यांनी गाळप हंगामाचा आढावा घेतला, यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, या हंगामासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ऊसाची कमतरता होती, त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी कारखाने बंद राहिले, सोलापूर जिल्हयातही तशीच परस्थिती होती. पांडुरंग कारखान्याचा गाळप हंगाम सुरु करतेवेळी जेमतेम ४ लाख मे. टन ऊस गाळप होईल असा अंदाज होता. परंतु कारखान्याने राबविलेला धोरणांचा आदरणीय चेअरमन श्री.सुधाकरपंत परिचारक यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करुन सुरुवातीपासूनच कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गाळपास आणणेचे सुयोग्य नियोजन करुन त्याप्रमाणे शेती विभागास योग्य सूचना दिल्यामुळे कारखान्याच्या गाळपाचे उदिष्ट पूर्ण करु शकलो.
 
त्यामध्ये ऊस उत्पादक, शेतकरी, वहान मालक, तोडणी ठेकेदार यांचे सहकार्य लाभले. माढा, करमाळा, माळशिरस, फलटण भागातील गेटकेन ऊस उत्पादकांच्या ऊसाच्या नोंदी घेणेसाठी मागील हंगामापासूनच नियोजन केल्याने, तेथील ऊस उत्पादकांमध्ये कारखान्या विषयी विश्वास निर्माण झाला. त्यामुळे तेथील लोकांनी पांडुरंग कारखान्यास ऊस देणेस प्राधान्य दिले. गाळप हंगामात कारखान्याचे स्टॉपेजेस अत्यंत कमी राहून डिस्टीलरी व को-जन प्रकल्पही उत्तमरितीने चाललेले आहेत.या हंगामात कारखान्याने ७ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट ठेवले होते ते पूर्ण करणे शक्य नव्हते परंतु आदरणीय चेअरमन श्री.सुधाकरपंत परिचारक, आ.मा. प्रशांतराव परिचारक, व्हा.चेअरमन वसंतराव देशमुख, संचालक मंडळाचे सहकार्याने ते पूर्ण केले आहे.
 
या हंगामात कारखान्याने ७,००, १०० मे. टन गाळप करुन सरासरी ११.००% (बी हेव्ही धरून) टक्के साखर उतारा मिळवित ७,६३,००० क्विं. साखर पोती उत्पादित केलेली आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे जिल्हयात साखर रिकवरीमध्ये प्रथम राहिल्याचा मान याही हंगामात अखंडीत ठेवला आहे. त्याचप्रमाणे जिल्हयात गाळपातही द्वितीय क्रमांक आहे. कारखान्याने ऊस बिलाचे पेमेंटही अगदी वेळेवर व नियमाप्रमाणे केले असून तोडणी व वहातुक ठेकेदारांची बिलेही वेळेवर देवून कामगारांची देणी पगार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ठेवीवरील व्याज व बँकाची देय असणारी सर्व देणीही अदा केली आहेत.
 
Yashwant Kulkarni_1 
 
याप्रसंगी कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ यशवंतराव कुलकर्णी साहेब यांनी सांगितले की चालू हंगामामध्ये आम्ही को-जनरेशन प्रकल्पामधून ४.७६ कोटी युनिट विज निर्माण करुन २.५३ कोटी युनिट विक्री केलेली आहे. डिस्टीलरी प्रकल्पातूनही आजपर्यंत ५७ लाख लिटर्स इतके उत्पादन घेतलेले आहे, हे दोन्ही प्रकल्प सध्या सुरु असून आणखी एक ते दीड महिना चालविणार आहोत. त्यामुळे या हंगामात डिस्टीलरी मधून सुमारे ८० लाख लिटर्स व को-जन मधून अंदाजे ५.५० कोटी युनिट विज निर्माण होवून सुमारे ३.०७ काटी युनीट विज विक्री होईल. कारखान्याचा पुढील हंगाम २०२०-२१ साठी कारखान्याकडे सुमारे ८ लाख मे. टनाच्या ऊस नोंदी झालेल्या असून सदरचा हंगामातही जास्तीत जास्त गाळप करणेसाठी आतापासून प्रयत्न करणार आहोत. हा हंगाम यशस्वी करणेसाठी कारखान्याचे अधिकारी, कामगार, तोडणी व वहातुक ठेकेदार, बैलगाडी, बजॅट ठेकेदार यांचेही मालाचे सहकार्य मिळाले.
- डॉ.यशवंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर जि. माळशिरस
 
Powered By Sangraha 9.0