राज्यात सात जण निरीक्षणाखाली

02 Mar 2020 20:23:18

राज्यात सात जण निरीक्षणाखाली

कोरोनाचा एकही संशयीत रुग्ण आढळलेला नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे

जनदूत टिम 
 
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सात जण निरीक्षणाखाली आहेत. मात्र आतापर्यंत एकही संशयीत रुग्ण आढळून आलेला नाही. सध्या मुंबईत दोन जण, तर पुणे येथे चार आणि नाशिक येथे एक जण भरती आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णालयात निरीक्षणाखाली १३७ जणांना ठेवण्यात आले होते त्यापैकी १३२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करीता निगेटिव्ह आले आहेत तर १३० जणांना घरी सोडण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

Corona_1  H x W 
बाधित भागातून आलेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या प्रवाशांनी २ आठवडे घरी थांबावे आणि सामाजिक संपर्क टाळावा, अशा सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत. आजपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीन, हॉंगकॉंग, थायलंड, सिंगापूर, द कोरिया,जपान, नेपाळ,इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया, इराण आणि इटली या १२ देशातील ५३५ विमानांमधील ६४ हजार ०९८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ३८२ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ३१८ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.
ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत १३७ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी १३२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले असून इतर ५ जणांचे अहवाल आज प्राप्त होतील.
Powered By Sangraha 9.0