महाराष्ट्रातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना

17 Mar 2020 12:45:44
ठाणे : ठाणे जिल्हा ठिकाणच्या महाविद्यालयातील इयत्ता १२ वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतू शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील (भटक्या जमाती-क) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पंडित दीननदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी भोजन भत्ता २५ हजार रुपये, निवास भत्ता १२ हजार रुपये व निर्वाह भत्ता ६ हजार रुपये असे एकूण ४३ हजार रुपये रक्कमेचा लाभ व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येते.

 Dhangar community_1  
 
योजनेतंर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याने इयत्ता १२ वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रकियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा, विद्याथ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल, अभ्यासक्रमाच्या मध्यावधी प्रवेश घेतलेले विद्यार्थी या योजनेस पात्र असतील, विद्यार्थ्याने आदीवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये प्रवेश घेतलेला नसावा, विद्यार्थी हा कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा. एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त ५ वर्षे या योजनेचा लाभ घेता येईल.
 
लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय २८ वर्षापेक्षा जास्त नसावे, धनगर समाजातील अपंग विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने देण्यात येईल, विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ६० टक्के असने बंधनकारक आहे. तरी ठाणे जिल्हयातील धनगर समाजातील जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे बलभीम शिंदे, यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0