मोर्बा नाका बंदरकर बिल्डिंग मध्ये लागलेली भीषण आग माणगांव पोलीसांनी विझवली

16 Mar 2020 14:27:51
बोरघर / माणगांव : माणगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोर्बा नाका येथे बंदरकर बिल्डिंगमध्ये रूम नंबर ३०२ ला शॉर्टसर्किटने आग लागल्याची माहिती कळताच तात्काळ माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रामदास इंगवले आणि नाईट राउंड चे कर्मचारी पोलीस शिपाई /५८३ कराळे, पोलीस शिपाई / २२३८ मिसाळ, पोलीस शिपाई २२१८ गीते, ठाणे अंमलदार पोलीस हवालदार/ १५२६ म्हात्रे पोलीस वाहन चालक पोलीस हवालदार/ १२८३ कुवेस्कर इत्यादी जांबाज पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्यांनी सर्व प्रथम बिल्डिंग मधील सर्व रहिवाशांना तात्काळ व्यवस्थित बिल्डिंग बाहेर काढले.

Fire_1  H x W:  
त्यानंतर पोलीसांनी प्रथम हॉल मधील आग अग्निशामक सिलेंडर ने विजून त्यानंतर पाण्याचा मारा करून आग विझवली नंतर समोरील बेडरूममधील आग बकेट ने पाणी मारून विझवली त्यानंतर बाजूच्या बेडरूम मधील आग पाण्याचा मारा करून विझवली. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या पोलीसांच्या ब्रीदवाक्या प्रमाणे आपल्या पोलीस खात्याची भूमिका उन, वारा, पाऊस वा नैसर्गिक आपत्तीची आणि प्रसंगी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या माणगांव पोलीसांच्या कर्तव्यदक्ष पणा व सतर्कतेमुळे मोर्बा नाका येथील बिल्डींग मधील सर्व रहिवाशी सुव्यवस्थित असून त्यांना कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. माणगांव पोलीसांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे बंदरकर बिल्डिंग मधील रहिवासी तसेच मोर्बा मधील मुस्लिम समाज आणि सर्व धर्मियांसह संपूर्ण माणगांव तालुक्यातून सर्वत्र कौतुक केले
जात आहे.
Powered By Sangraha 9.0