मुंबईतील राणीची बाग बंद तर पुण्यात अंगणवाड्या बंद

जनदूत टिम    15-Mar-2020
Total Views |
मुंबई/पुणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं कंबर कसली आहे. भायखळा येथील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आजपासून बंद ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाचे पुढील आदेश येईपर्यंत हे उद्यान नागरिकांसाठी बंद असेल. नागरिकांनीही सहकार्य करावं, असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे.
 
Ranibaugh_1  H
 
दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका व सर्व नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले. सरकारचे आदेश न पाळणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यामध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेश येईपर्यंत परवानगी देण्यात येऊ नये. तसेच यापूर्वी देण्यात आली असल्यास ती परवानगी रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.