भाऊचा धक्का ते मांडावा जेट्टी रो रो सेवेला सुरुवात

जनदूत टिम    15-Mar-2020
Total Views |
मुंबई : मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबागनजिक मांडवा पर्यंतच्या सागरी रो-पॅक्स फेरीसेवा आणि मांडवा रो-पॅक्स टर्मिनलच्या आज होत असलेल्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड व कोकणवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. रायगडसह कोकणात चिपळूणपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही फेरीसेवा उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
 
Boat_1  H x W:
 
'कोरोना' प्रतिबंधक मार्गदर्श सूचनांनुसार फेरीसेवेचा आज होत असलेला औपचारिक उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री महोदयांनी या फेरीसेवेच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मराठा आरमाराचे प्रमुख, सरखेल कान्होजी आंग्रे यांचा वारसा, एका आधुनिक पद्धतीनं आपण पुढे नेत आहोत, यासेवेमुळे, भाऊचा धक्का ते मांडवा प्रवास केवळ पाऊण तासात पूर्ण होणार आहे. प्रवाशांचा वेळ आणि इंधनात बचत होईल. मुंबई-गोवा मार्गावरची वाहतुक कोंडी कमी होण्यासही मदत होईल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
 
मुंबईला नागपूरबरोबर जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर, पाचशे किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड महामार्ग कोकण किनारपट्टीवर बांधण्यात येणार असल्याची घोषणा काल विधीमंडळात करण्यात आली. शिवडी ते न्हावा शेवा पोर्ट जिथे संपतो त्या रायगड जिल्ह्यातील चिर्ले गावापासून महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पात्रादेवी पर्यंत सुमारे पाचशे किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असेल. या मार्गाची आखणी कोकणपट्टीच्या किनार्याचजवळून करण्यात येणार आहे, त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोकणचे निसर्गसौंदर्य पाहता येईल, शिवाय समुद्रकिनार्याकलगतच्या पर्यटन विकासालाही चालना यामुळे मिळेल, अशी माहितीही यानिमित्ताने उपमुख्यमंत्यांांनी दिली आहे.