जव्हार तालुक्यात पर्यटन विकासाच्या नावाने बोगस कामांचा सुळसुळाट

13 Mar 2020 16:46:52
जव्हार: जव्हार तालूक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग हा गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टकारभारामुळे कुप्रसिध्द असल्याचे दिसत आहे. येथिल अभियंता आणि काही ठेकेदारांच्या संगनमताने विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वर्षानुवर्षे सुरु असून वरपर्यंत हात आसल्याने राजरोसपणे मलीदा लाटण्यात येत असलूयाचे दिसत आहे .
 
Javhar_1  H x W
 
जव्हार तालूक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमीच वादाच्या भोवर्यात सापडलेला दिसून येतो. येथिल अधिकारी हायलेवलचा हात आपल्या डोक्यावर असल्याचे चिञ उभे करुन काही निवडक ठेकेदारांना हाताशी धरुन भ्रष्टाचार करण्यात तरबेज झाले आहेत . तालूक्यात विविध योजनेच्या नावावर लाखोरुपये आणून बोगस कामे दाखवून बिले काढण्याचा सपाटा सुरु आहे . मागिल वर्षभरापुर्वीच जव्हारमधील शिरपामाळ या पर्यटन क्षेञाच्या विकासकामासाठी जि.प.बांधकाम विभागाकडून काम करण्यात आले आहे . या आधीही नगरपरिषदेकडून या ठिकाणी कामे करण्यात आली आहेत . मागील वर्षात करण्यात आलेल्या कामावरच आता पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याच कामासाठी २२ लक्ष रुपयाची निविदा काढण्यात आली आहे . तर तालूक्यातील हिरडपाडा येथिल पर्यटन क्षेञाच्या विकासावर आता पर्यत करोडो रुपये खर्च करण्यात आले असुनही आता पुन्हा ४५ लक्ष रुपयाची निविदा काढण्यात आली आहे . हि दोन्ही कामे पर्यटन विकासाच्या नावाखाली मलिदा लाटण्याच्याच साठी काढली गेली असुन जनतेमध्ये अधिकारी आणि ठेकेदारांबाबत नाराजी व्यक्त होत आहे .
 
जव्हार तालूक्यात सध्या अनेक पर्यटन स्थळांवर विकासाच्या नावाने मोठा निधी आणून भ्रष्टाचार करण्याचे मोठे रॕकेट निर्माण झाले असून याबाबत शासनाने समिती नेमून चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे .
 
 
Powered By Sangraha 9.0