चक्क स्वतःच्या लग्नसोहळयात लग्नमंडपातच घेतली ओबीसी जनजागृती सभा व पाट्या लावा कार्यक्रम

12 Mar 2020 17:32:00
शहापूर : मंगळवार दि. १०-०३-२०२० धुळवड च्या दिवशी गोकुलगाव (लेनाड) येथील मयुरी चंद्रकांत विशे या मुलीने आपल्या लग्नमंडपातच ओबीसी जनजागृती सभा व पाट्या लावा कार्यक्रम आयोजित करून एक आगळा वेगळा आदर्श आपल्या समाजबांधवाना दिला आहे, ओबीसी समाज निद्रिस्त अवस्थेत असल्याने आजपर्यंत त्यांची सरकार जनगणना करत नाही, समाजाला जागृत करण्यासाठी व ओबीसी जनगणनेचा लढा अधिक बळकट करण्यासाठी लग्न असो, बारसे असो, पूजा असो की धार्मिक सप्ताह चे कार्यक्रम असो या कार्यक्रमात अशा प्रकारचे समाज जनजागृती चे व्याख्यान ठेवायला हवे असे ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घडून आला कल्याण समाज संघ चे अध्यक्ष गोविंदजी धीर्डे यांनी आपले मत व्यक्त केले.
 
OBC_1  H x W: 0
 
कार्यक्रमासाठी गावातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता तर ओबीसी संघर्ष ठाणे तर्फे सुरेशजी कापरे, जयवंतजी मोगरे, एकनाथजी धानके, प्रमोद जाधव, विनोद भोईर, निलम भोईर उपस्थित होते, गोकुलगाव च्या वतीने जनगणनेवर बहिष्कार टाकण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0