डोंबिवलीमध्ये जागतिक अपंग दीन साजरा

04 Dec 2020 23:19:00

अपंग व्यक्तींना कुठलीही कमी पडू देणार नाही - दिपेश म्हात्रे

डोंबिवली : जागतिक अपंग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला.हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो.
 
apanga din257_1 &nbs
 
शिवसेना शहर अध्यक्ष राजेश मोरे, माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अपंग व्यक्तींसाठी अन्नधान्य सोबतच मिठाईचे वाटप करण्यात आले.विश्वधर्म अपंग मानवसेवा संघ या संस्थेच्या माध्यमातून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्षापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अपंगांसाठी त्यांना लागणाऱ्या वस्तू किंवा त्यांचे कृत्रिम अवयव , व्हीलचेअर आदी. देण्यात आले होते असंच भव्य उपक्रम आम्ही लवकरच राबवणार आहोत असे यावेळी दीपेश म्हात्रे म्हणाले.
 
राज्य शासनाच्या तसेच महापालिकेच्या अपंग निधीतून आम्ही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवू असे राजेश मोरे म्हणाले. सोशल डिस्टंसिंग चे पालन करीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी दीडशेहून जास्त अपंग बांधवांना अन्न धान्य तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले .
Powered By Sangraha 9.0