मुरबाड शहरातील शुक्रवार बाजारपेठ सुरू करण्यासाठी निवेदन...

04 Dec 2020 20:16:51
मुरबाड : लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर मुरबाड शहरातील शुक्रवार बाजारपेठ बंद असल्याने ग्राहक व व्यापारी वर्गाला त्रास होत असलेल्याने आज सुपरस्टार आॅल सोशल मिडिया वेल्फेअर फाऊंडेशन पत्रकार संघटनेच्या शिष्टमंडळाने मुरबाड नगरपंचायंत मध्ये जाऊन देवकर यांना निवेदन देऊन शुक्रवार बाजारपेठ नियमित सुरू करण्याची मागणी केली आहे.

murbad01_1  H x 
 
सदर निवेदन देताना सुपरस्टार आॅल सोशल मिडिया वेल्फेअर फाऊंडेशन पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब भालेराव राज्य सचिव लक्ष्मण पवार ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष शांताराम विशे जिल्हा सरचिटणीस रोहित झुंजारराव उपस्थित होते
Powered By Sangraha 9.0