मनोज चौधरी आयोजित भव्य रोजगार मेळावा

29 Dec 2020 13:31:14
कल्याण : कोरोना च्या महामारी मुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी सर्व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रभाग क्र. ४५ कचोरे शिवसेना शाखेच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांच्यावतीने भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये २५ते ३० कंपन्यांचा समावेश होता.
 
rojgar melava2_1 &nb
 
बॅक ऑफिस, एच डी एफ सी बँक, बीपीओ,ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, आयसीआयसीआय बँक, एल आय सी, गोदरेज, रिलायन्स , सिक्युरिटी गार्ड आदी नामचीन कंपनीमध्ये बेरोजगारांना रोजगार चौधरी यांनी उपलब्ध करून दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च पासून केंद्र सरकारने कलम १४४ लावून भारत देशात लोकडाऊन केला होता. तर काही नागरीक ७५टक्के घरे बंद करून बसले होते. तसेच परिणाम म्हणजे देशामधील वाढती बेरोजगारी या सर्व बाबींचा विचार करून चौधरी यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले. या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक रमेश जाधव कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे.विधानसभा विधानसभा संपर्कप्रमुख शरद पाटील. हर्षवर्धन पलांडे.
 
समाजसेवक उमेश शेट्टी. ज्येष्ठ समाजसेवक प्रदीप गायकवाड. परिवहन सदस्य बंडू पाटील. माजी सभापती संजय पावशे. दिलीप दाखिंकर . अजित चौगुले. इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी उप शहर वृक्ष अधिकारी युवा कमलाकर चौधरी. युवा विभाग अधिकारी राहुल चौधरी. उपशाखाप्रमुख विशाल मुकादम, हरिश्चंद्र म्हात्रे, सुभाष शर्मा, राजू पांडे, सिद्धांत जोगदंड, लाल मन पांडे, संजय सिंग, कृष्णा सिंग, योगेश चौधरी तसेच समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.
Powered By Sangraha 9.0