शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात

25 Dec 2020 18:26:22
ठाणे : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातातून एकनाथ शिंदे बचावले आहे. त्यांना या अपघातात किरकोळ दुखापत झाली. मात्र, गाडीचे नुकसान झाले आहे.
 
Eknath Shinde02_1 &n
 
एकनाथ शिंदे यांच्या टोयटा एसयुव्ही गाडीला गुरुवारी २४ डिसेंबर रोजी नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर अपघात झाला. या अपघातात गाडीच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातातून एकनाथ शिंदे बचावले आहे. त्यांच्या अंगठ्याला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती उत्तम आहे, असे वृत्त टीव्ही ९ वृत्तवाहिनीने दिले आहे.
 
Powered By Sangraha 9.0