शिक्षक नेते माजी आमदार शिवाजीराव (आण्णा) पाटील यांचा प्रथम स्मृतिदिन भिवंडी तालुक्याच्या वतीने साजरा!

15 Dec 2020 21:20:57
अंबाडी : प्राथमिक शिक्षकांचे आराध्य दैवत, शिक्षक ह्रदय सम्राट दिवंगत माजी आमदार- शिवाजीराव ( आण्णा) पाटील यांचा आज दिनांक १५ डिसेंबर २०२०. प्रथम स्मृतिदिन या निमित्ताने भिवंडी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने अंबाडी नाका गायकवाड निवास येथे भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला.
 
ambadi_1  H x W
 
उपस्थित शिक्षकांनी आपल्या आदरनीय नेत्याला यावेळी भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली.यावेळी उपस्थित शिक्षक संघाचे पदाधिकारी प्रबुद्ध गायकवाड (राज्य उपाध्यक्ष), प्रकाश भोईर ( जिल्हा नेते), विजय गायकवाड ( ठाणे जिल्हा परिषद शिक्षण समिती स्विकृत सदस्य), स्वप्निल पाटील ( तालुका अध्यक्ष) आदिंनी आपले मनोगत व्यक्त करतांना असे म्हटले की, आदरनीय आण्णांनी तमाम महाराष्ट्रातील किंबहुना भारत देशातील प्राथमिक शिक्षकांच्या जीवनात सुवर्ण क्षण निर्माण केले आहेत.त्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे कुटुंब सुखी समृद्ध आणि प्रगतीशील जीवन जगत आहेत.
 
अण्णांनी आपल्या अथक परिश्रमाने व कर्तृत्वाने तसेच नेत्रृत्वाने राष्ट्रीय व राज्य स्तरावरील अनेक प्रश्नांची सोडवणूक करून प्राथमिक शिक्षकांचे समृदध जीवन फुलविले आहे. अण्णांच्या पुण्याईने तमाम प्राथमिक शिक्षक आजचे समाधानाचे व आनंदाचे दिवस पहात आहेत. त्यांच्या कार्याचा वसा घेऊन राज्याध्यक्ष राजाराम वरुटे सर, सरचिटणीस केशवराव जाधव सर, सल्लागार वसंतराव हरुगडे सर, माजी राज्याध्यक्ष बाळासाहेब काळे सर, मधुकर काठोले सर, लायक पटेल सर, विजय बहाकर सर, तुकाराम कदम सर व माधवराव (आप्पा) पाटील सर (राष्ट्रीय अध्यक्ष) दि.रा. भालतडक सर (राष्ट्रीय उपाध्यक्ष) आदि राष्ट्रीय व राज्य स्तरावरील संघाची मान्यवर पदाधिकारी मंडळी धडाडीने अहोरात्र प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी सोडवण्यासाठी कार्यरत असल्याची कृतज्ञता यावेळी उपस्थितांसमोर व्यक्त केली. त्याचबरोबर अण्णांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याबद्दल प्रत्येक शिक्षकाने आपली कृतज्ञता व्यक्त करणे हे आद्य कर्तव्य समजले पाहिजे. अशा स्पष्टपणे संबंधित वक्त्यांनी आपल्या भावना मनोगतातून
व्यक्त केल्या.
Powered By Sangraha 9.0