कळवा मंडळ उपाध्यक्ष भाजप ओम प्रकाश जायसवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

14 Dec 2020 19:00:44
कळवा : भारतीय जनता पार्टी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सशक्त भारत व सशक्त भाजपा या विचाराला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप कळवा मंडळ उपाध्यक्ष ओम प्रकाश जायसवाल यांच्या कळवा पूर्व वाघोबा नगर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कोकण पदवीधर चे आमदार व ठाणे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या हस्ते संपन्न झाले त्याप्रसंगी मान्यवर माजी खासदार किरीट सोमय्या ठाणे शहर आमदार संजय केळकर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधवीताई नाईक महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लेले ठाणे शहर सचिव मनोहर सुगदरे महिला उपाध्यक्ष दीपा गावंड कळवा मंडळ अध्यक्ष हिरोज कपोते किंवा अध्यक्ष सारंग मेढेकर माजी उपमहापौर अशोक भोईर ठाणे शहर सचिव नीता पाटील कळवा मंडळ उपाध्यक्ष श्रीकांत ठोसर कार्यकारिणी सदस्य अरविंद कलावर उपस्थित होते.
  
kalva2584_1  H
 
कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना निरंजन डावखरे संबोधित केले की भारतीय जनता पार्टी चे ओम प्रकाश जायसवाल यांच्या कार्यालयांमध्ये येथील नागरिकांच्या समस्यांचे निवारण योग्य पद्धतीने केले जाते ज्या पद्धतीने कोरणा च्या काळामध्ये ओम प्रकाश जायसवाल यांनी स्वखर्चाने नागरिकांसाठी मदत केलेली आहे अन्नधान्याचे वाटप औषधांचे वाटप करून त्यांच्या सुखदुःख मध्ये सहभागी होऊन त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहिलेले आहेत या परिसरामध्ये विविध पक्षाचे नगरसेवक आहेत पण लाँक डाऊन च्या काळामध्ये एकाही नगरसेवकाने तिथे फिरकला नाही या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची समस्या सोडवण्यात पूर्णपणे प्रयत्न ओम प्रकाश करतील अशी मला आशा आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेश पवार कन्हैयालाल विश्वकर्मा अनिल दुबे अमित यादव महेंद्र गुप्ता गुड्डू जयस्वाल आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0