प्रा. शरद गोखले यांचे वयाच्या ८६ व्या वर्षात पदार्पण

13 Dec 2020 17:34:18
नगर : येथील हिंद सेवा मंडळाचे आजीव सक्रीय सभासद आणि पेमराज सारडा महाविद्यालयाचे सेवानिवृत्त ग्रंथपाल प्रा.श्री.शरद विष्णू गोखले यांनी आज शनिवार दि.१२ डिसेंबर २०२० ला वयाची ८५ वर्षे पूर्ण करून ८६ व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण केले. शुध्द शाकाहार, नियमित व्यायाम आणि निर्व्यसनी जीवनशैली हीच त्यांच्या जीवन वाटचालीची गुरूकिल्ली आहे.
 
sharad gokhle_1 &nbs
 
जागतिक महामारी कोरोनाच्या परिस्धितीतही त्यांनी आपल्या शिस्तबध्द व नियमित जीवनशैलीतून वयाच्या ८६ व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण केले. याबद्दल श्रीनिधी प्रकाशनचे प्रकाशक-पत्रकार मिलिंद चवंडके यांनी आज सकाळी सर्वप्रथम शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, अशोक उपाध्ये, सुप्रभात ग्रुपचे अविनाश जोशी, सतीश सुपेकर यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
 
प्रा. शरद गोखले हे नगरमधील सरगमप्रेमी मित्र मंडळाचे संस्थापक सदस्य असून भोर येथील भोर एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार व आधारवड या ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थेचे संस्थापक आहेत. सुप्रभात ग्रुपचेही सभासद आहेत. भोर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डाॅ.बिरासदार, आधारवडचे पद्माकर नांदूरकर, सरगमप्रेमी मित्र मंडळाचे धनेश बोगावत व महेश कुलकर्णी यांनीही गोखले सरांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
 
ज्येष्ठ नागरिकांनी आजच्या कोविड महामारीला न घाबरता स्वतःची विशेष काळजी घेतली तर भितीचे कारणच रहात नाही. घरात सुरक्षितपणे राहून कुटूंबियांसोबतचा आनंद मनसोक्तपणे लुटता येतो. जीवनाचा आनंद घेणे व सतत आनंदी रहाणे आपल्याच हाती आहे, असा मौलिक संदेश प्रा.शरद गोखले यांनी आपल्या स्वानुभवातून दिला आहे.
Powered By Sangraha 9.0