महिलांच्या संरक्षणासाठी “ शक्ती कायदा” करण्याचा निर्णय घेतल्या बद्द्ल महाविकास आघाडी शासनाचे आभार - श्रीमती सुमन अग्रवाल

जनदूत टिम    10-Dec-2020
Total Views |
मुंबई : महिला व बालकांवरील अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी, बलात्कार, ऍसिड अटॅक आणि इतर गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्या प्रकरणी, मृत्यू दंडाची तरतूद असलेला कठोर कायदा, महाराष्ट्र राज्यात पारित केल्या बद्दल महाविकास आघाडी शासनाचे, स्त्री चळवळीतील प्रसिद्ध नेत्या, प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस श्रीमती सुमन अग्रवाल यांनी जाहीर आभार मानले आहे .
 
suman agrawal_1 &nbs
 
ऍसिड हल्ला , सामूहिक बलात्कार या सारख्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देण्याची तरतूद असलेला “ शक्ती कायदा” करण्याचा निर्णय महाविकास आघाडी शासनाने कालच घेतला आहे. या कायद्या अंतर्गत ऍसिड हल्ला , विनय भंग इत्यादी प्रकारचे गुन्हे अजामनि पात्र ठरणार आहेत .अशा प्रकारचे खटले एका महिन्यात निकाली काढण्याची तरतूद या कायद्यात असून महिलां वरील अत्याचार रोखण्यासाठी “ शक्ती” हा नवीन कायदा शासनाने निर्माण केलेला आहे.
 
या कायद्यामुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना निश्चित पायबंध बसेल व गुन्हेगारांना जरब बसेल असा विश्वास श्रीमती सुमन अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे .