मुंबईत क्रॉफर्ड मार्केटजवळ इमारतीला आग, चार दुकानं जळून खाक

जनदूत टिम    09-Nov-2020
Total Views |
मुंबई : आज पहाटे पाचच्या सुमारास मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग लागली होती. या ठिकाणच्या काही दुकांनांना आग लागली. दिवाळीच्या तोंडावर गर्दीच्या ठिकाणी ही लागली. आगीमुळे परिसरात प्रचंड धुराचं साम्राज्य पसरलं होतं. त्यानंतर १२, साडे बाराच्या सुमारास या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.
 
Mumbai-Fire_1  
 
क्रॉफर्ड मार्केटमधील अब्दुल रेहमान स्ट्रीट इथे चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. ही आग एल-टू लेव्हलची असल्याची माहिती आहे. मात्र, सध्या अग्निशमन दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात पूर्णपणे यश आलं आहे.
 
क्रॉफर्ड मार्केट येथील ३१, ३२ अब्दुल रेहमान स्ट्रीट या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत मेडिसान, स्टॉकची चार दुकांनं जळून खाक झाल्याची माहिती आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. तसेच, या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पॅकिंग मटेरिअल आणि प्लास्टिकचं सामान असल्यामुळे आग पसरल्याचं सांगण्यात येत आहे.
 
दिलासादायक म्हणजे अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर येळेत नियंत्रण मिळवलं त्यामुळे मोठी हानी टळली. तसेच, या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील सर्व नागरिकांनी सुखरुप बाहेर काढण्यात जवानांनी यश आलं. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही. सध्या अग्निशमन दलाचे जवान कुलिंग ऑपरेशन राबवत आहे.