द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे जिल्हास्तरीय युवा महोत्सव

29 Nov 2020 12:51:53
उरण : कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध 'द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन' या संघटने तर्फे खेळाडू , कलाकार, गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कौशल्यांना वाव देण्यासाठी, स्पर्धेतुन उतमोत्तम गुणीजण खेळाडू, कलाकार तयार करण्याच्या अनुषंगाने बुधवार दि २०/०१/२०२१ ते रविवार २४/०१/२०२१ दरम्यान वीर सावरकर मैदान, उरण शहर ता:उरण, जिल्हा-रायगड येथे सोशल व फिसिकल डिस्टन्स ठेवून शासनाचे आदेश पाळत जिल्हा स्तरीय २०वा युवा महोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे.
 
dronagiri_1  H
 
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक गुणवंत राज्यस्तरीय, राष्ट्रीय खेळाडू, कलावंत, कलाकार तयार झाले आहेत. खेळाडू, कलाकार आदि स्पर्धकांसाठी एक उत्तम व्यासपीठ (प्लेटफॉर्म) मिळवून देण्याचे काम द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनने केले आहे. दरवर्षी या स्पर्धेस या युवा महोत्सवाला सर्व राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, सिने अभिनेते आवर्जून भेट देत असतात. कोणताही भेदभाव न करता राजकीय पक्ष विरहित असा हा महोत्सव असल्याने दरवर्षी या युवा महोत्सवाला जनतेचाही उत्तम प्रतिसाद मिळतो. दरवर्षी होणाऱ्या युवा महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिंना द्रोणागिरी पुरस्काराने सन्मानित केले जाते.यंदाही विविध व्यक्तिंना द्रोणागिरी पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
 
यंदा २० ते २४ जानेवारी २०२१ दरम्यान वीर सावरकर मैदान उरण येथे २० व्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये डान्स, आर्चरी स्पर्धा, एथलेटिक्स स्पर्धा, देशी खेळ, मैदानी खेळ आदि ११० हुन वेगवेगळ्या स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे.कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सोशल व फिसिकल डिस्टन्स पाळून, शासनाचे नियम पाळून हा युवा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.विशेष म्हणजे या रायगड जिल्हास्तरीय युवा महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत खेळाडू कलाकार, विविध क्षेत्रातील व्यक्ति यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी द्रोणागिरी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक आदि क्षेत्राशी सबंधित विविध स्पर्धांचा समावेश असतो. अश्या या जिल्हा स्तरीय स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडू, कलाकार व स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी केले आहे.
 
स्पर्धेसाठी प्रवेशिका स्विकारण्याची अंतिम तारीख १६ जानेवारी २०२१ असून स्पर्धकांनी आपले अर्ज व नाव नोंदणी गौरीनंदन अपार्टमेंट, शॉप नंबर ७, चारफाटा उरण जि-रायगड पिन ४००७०२५,
ऑफिस फोन नंबर-०२२२७२२४४९८ येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत करायचे आहे dronagiri.sports@gmail.com या ईमेल द्वारेही प्रवेशिका स्वीकारण्यात येईल. अधिक माहितीसाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे खजिनदार शिवेंद्र म्हात्रे- ८२९१६१६८२६, क्रीडा प्रमुख भारत म्हात्रे- ९६१९५९६४५६
फारुख खान- ८६५२६०३४०५ यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात
आले आहे.
Powered By Sangraha 9.0