मुरबाड नगरपंचायतचा प्रताप - एकाच रस्त्याचे दोन वर्षाच्या कालावधी मध्ये डांबरीकरण व आता काँक्रीट करण

जनदूत टिम    27-Nov-2020
Total Views |
मुरबाड : मुरबाड नगरपंचायत हद्दी मधील राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ ते डोहळ्याचा पाडा या रस्त्याचे दोनच वर्षा पूर्वी मुरबाड नगरपंचायत मार्फत डांबरीकरण करण्यात आले होते.

murbad01244_1   
 
नगरपंचायत कडे इंजिनियर नसल्याने सदर चे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, मुरबाड यांच्या मार्फत करण्यात आला होते. माझ्या माहिती नुसार ह्या कामाची रक्कम नगरपंचायत कडुन सा. बा. मुरबाड ला वर्ग करण्यात आली होती हा रस्ता इतका उत्कृष्ट होता की तीन ते चार महिन्यातच दबला व उकडला गेला.
 
तेव्हा या रस्त्यावर अंदाजे १५ ते १८ लाख खर्च झाले होते म्हणजेच खड्ड्यात गेले होते. आता पुन्हा त्याच रस्त्याचे मुरबाड नगरपंचायत मार्फत  म्हणजेच सामन्य मुरबाडकर भरत असलेल्या कर रूपी पैसां चा चुरडा करण्यासाठी काँक्रीटकरणाच्या कामचे उद्घाटन आज करण्यात आले. आता हे काम किती लाखांचे असेल हे सध्या तरी माहित नाही. आधी झालेले डांबरीकरणाचे काम योग्य झाले असते तर पुन्हा लाखो रुपये खर्च करण्याची गरज नसती पडली.
 
असो मुरबाड नगरपंचायत च्या प्रतापा मुळे का होईना पण डोळ्याचा पाडा रहिवाशांना काँक्रीटकरण रस्ता मिळाला या बद्दल त्यांचे मनसे अभिनंदन तसेच हा काँक्रीट रस्ता तरी योग्य होईल अशी आशा बाळगु या.