वाडिव वीज बिल विरोधात मनसे तर्फे आंदोलन

जनदूत टिम    26-Nov-2020
Total Views |
माणगांव : कोरोनाचा काळात कडक लॉकडाउन शासन तर्फे केल्याने तमाम नागरिकांचा अपरिमित वित्तीय नुकसान जाले होते, असा वेळेत सर्व जनतेस प्रचंड वीज बिल पाठवून अक्षरश लूट सुरु केली. या विरोधात मनसेकडून शासनास वीज बिल माफ करा अगर सौलत द्यावे म्हणून वेळोवेळी विनंती करण्यात आले होते.
 
Mangaon_1  H x
 
मात्र हे सरकार पुढे काहीही पाऊल उचलत नसल्याने या निद्रिस्थ सरकारला जाब विचारण्यासाठी तीव्र निषेध करण्यासाठी तसेच जनतेनी या सरकारला शॉक म्हणून वाडिव बिल न भरण्याचा आव्हान मोर्चे दरम्यान केले. या वेळी माफ करा, माफ करा. वीज बिल माफ करा. असा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडले. पुढे सरकारचे निषेध म्हणून विरोधातहि घोषणा दिले. त्यानंतर उप विभागीय प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले. वागमारे यानी प्रांत अधिकारी यांचा
तर्फे स्वीकारले.
 
दक्षिण रायगड मनसे अध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांचा अध्यक्षतेखाली एक भव्य मोर्चा निजामपूर रोड,मनसे कार्यालयांपासून ते मुख्य बाजार पेठ, कचेरी रोड तसेच प्रांत कार्यालय पर्यंत काढण्यात आले. या समयी तालुका अध्यक्ष सुबोध जाधव, उपाध्यक्ष प्रतीक राहाटे, दक्षिण रायगड मनसे सचिव किशोर देशपांडे, माथाडी कामगार दक्षिण रायगडचे जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड, तालुका संपर्क प्रमुख चिमणी सुखघरे, सर्व सेलचे पदाधीकारी आणि अनेक कार्यकर्ते प्रचंड संख्येनी उपस्थित होते.हि मोर्चा आज गुरुवार दी. २६ रोजी १२:३० च्या दरम्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी पोलीस बंदोबस्त चोक दिसुन आले.