MMRDA अधिकृत परवानगी देण्यासाठी सज्ज आहे का..?

जनदूत टिम    26-Nov-2020
Total Views |

भविष्य नको वर्तमान पाहिजे - विक्रम अनंता पाटील

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्याच्या २७ गावांतील कोळे गावात विक्रम अनंता पाटील राहत असून असून अधिकृत बांधकाम परवानगी साठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज असते व ते सर्व कांगदपत्र त्यांनी MMRDA ला दिले असून MMRDA ने त्यांच्या जागेची अर्ध्या F. S. I ने परवानगी दिली. MMRDA १० गावांमध्ये गावकऱ्यांची इच्छा नसताना भागात कल्याण ग्रोथ सेंटर अशी योजना आणते.

MMRD_1  H x W:  
 
याच ग्रोथ सेंटर चा असा नियम आहे की, आपल्या संपूर्ण जागे पैकी संपूर्ण जागा MMRDA घेणार व त्या जागेपैकी अर्धी जागेचा क्षेत्र जमीन धारकांना देण्यात येणार. आणि तो क्षेत्र Development Plot असणार. अशी माहिती गावकऱ्यांना निळजे गावात झालेल्या सभेत MMRDA चे आयुक्त प्रवीण दराडे यांनी माहिती दिलेली होती. पण MMRDA ने विक्रम पाटील यांच्यासोबत सांगितल्या प्रमाणे केलेलं नाही. कारण MMRDA ने पाटील यांना अर्धी जागा सोडण्यास सांगितली, आणि अर्ध्या जागेचाच F, S, I दिला आणि त्या मध्ये वाणिज्य (Commercial) बांधण्याची सक्ती करण्यात आली. मग कोणत्या प्रकारे MMRDA ने मला *Development Plot* दिलाय. असा प्रश्न पाटील यांनी MMRDA यांना विचारला आहे.
 
ही MMRDA आपल्या भागात कल्याण ग्रोथ सेंटर करणार आहे. ग्रोथ या शब्दाचा अर्थ आपल्याला ठाऊक आहे का..? ग्रोथ म्हणजे मराठी सभ्य भाषेत वाढ..! आणि या MMRDA ने आपल्या विभागाची 4 वर्ष झाले वाढ थांबिवली आहे. आज इथे सर्वांना वाटत असेल की हा विषय फक्त माझ्या एकट्याचा आहे, पण आपण सर्व एक गोष्ट विसरत आहात. आज जो त्रास मला होतोय तोच त्रास या पुढे अधिकृत बांधकाम परवानगी घेण्यासाठी जो जाईल त्यांना होईल. अशी स्पष्टोक्ती विक्रम पाटील यांनी केली आहे.