कालनिंर्णय आणि आमची फसवणुक..!

जनदूत टिम    25-Nov-2020
Total Views |
१९९६ साली जयवंत साळगांवकर या ब्रामणाने कालनिर्णय दिनदर्शिका छापली त्यावेळी मी लहान होतो. आई २० रुपये रोजाने शेतात खुरपनी करण्यासाठी जायची. एके दिवशी मी शाळेतून घरी आलो.. माझ्यासारखा प्रत्येक मुलगा शाळेला सुट्टी कधी असते यासाठी नेहमी कालनिर्णय पाहण्यात गुंतलेला असायचा, त्याच प्रमाणे मी ही कालनिर्णय पाहण्यात दंग होतो, मग अचानक आईने माझ्या हातातून कालनिर्णय घेतले व ते उलटे चाळून पाहू लागली.

Kalnirnay_1  H  
 
आई कालनिर्णय पाहणे झाल्यानंतर ते ठेऊन निघून गेली, मग माझ्या मनात वेगवेगळे विचार येत होते, मग मी ही ते कालनिर्णय उलटे पाहू लागलो, मग माझ्या लक्षात आलं की माझी आई कालनिर्णय उलटे का पाहत होती. त्या कालनिर्णयाच्या मागच्या बाजूला एका वर्षात करोंंडपती होण्याकरीता उपाय दिलेला होता. तो म्हणजे वैभव लक्ष्मीचे व्रत..!
 
आई रोज शेतातून खुरपनी करुन घरी यायची अन् दर आठवड्याला २० रुपये रोजाप्रमाणे आलेले ८० रुपये त्यातून ११ वैभव लक्ष्मीच्या पुस्तकाचे वाटप करायचे, त्या एका वैभवलक्ष्मी पुस्तकाची कीमत त्यावेळी ५ रुपये तर ११ पुस्तक ५५ रुपयाचे होत असत आणि सर्वांना ते पुस्तक मोफत वाटप करुन व्रत करायला सांगायचे.. हे मी नेहमी माझ्या डोळ्याने पाहत होतो. मग असं करता करता २० वर्ष उलटून गेली पण माझी आईच काय तर इतर महिलापैकी कुणीही करोड़पती झाल्याचे आढळून आले नाही. उलट २०१५ला ज्या जयवंत साळगांवकरने हा करोडपती होण्याचा उपाय दिला होता तो जयवंत साळगांवकर नावाचा माणूस कालनिर्णय आणि वैभवलक्ष्मीची पुस्तके विकून १८० कोटीचा मालक झाला आहे. वैभव लक्ष्मीचे व्रत करणाऱ्या सर्व महिला मात्र आजही शेतात खुरपनी करताना दिसून येत आहेत..!
 
आज महाराष्ट्रात ९ करोडच्या आसपास लोक आहेत...पैकी ४ करोड महिला आहेत...पैकी १ करोड महिला ईतर धर्मिय असल्याने ते हे सर्व करत नाहित....पैकी ५० लाखच्या आसपास महिला ह्या ऊच्च शिक्षीत असल्याने या भानगडीत पडत नाहीत... म्हणजेच अडिच लाख महिला (कमी शिकलेल्या व एकदम अशिक्षीत) हे कर्मकांड मानतात व करतात, त्याचे गणित आपण समजून घेऊ या...
२,५०,००० गुणीले ५ रु. पुस्तक किंमत
=७,५०,००० एक गुरुवार
महिन्यातून ४ गुरुवार = ३० लाख रु.
२० वर्षे गुणीले ३० लाख
= ६ अब्ज रुपये
 
यामध्ये पुस्तकाचा दर्जा, पुस्तकाच्या पानाची कॉलिटी, याचा खर्च, प्रिंटिंगचा खर्च, कमिशनचा खर्च, सर्व दुकानांचा खर्च हे सारे वजा जाता निव्वळ जयंत साळगावकर या ब्राह्मणाला १८० कोटींचा नफा झाला.......व तो स्वत: करोडपती झाला!
आमच्या मूलनिवासी आया बहिणी मात्र अजूनही महालक्ष्मीच्या कृपेची वाट
बघत आहेत...!
 
म्हणून म्हणतो बदला ते कालनिर्णय... आता भिंतीवरी फक्त तुमचे कामाची राेजनीशी ठेवा, जय भारतीय, तुमच्या कर्माची
दिनदर्शिका असावी...!