लिटिल चेस् चॅम्पियन हर्षित बोराडे स्काॅलरशीपच्या गुणवत्ता यादीत!‍‍

जनदूत टिम    23-Nov-2020
Total Views |
 
Harshit_1  H x
 
वासिंद : न्यू आयडीयल स्कूल वासिंद मधील राज्यस्तरीय बुद्धिबळ खेळाडू हर्षित बोराडे (इ.५ वी) याने इंग्रजी माध्यमातून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२० मध्ये ग्रामिण भागातून १७८ गुण प्राप्त केले असून गुणवत्ता यादीत ५१ वा क्रमांक मिळविलेला आहे.त्याला उज्वल यश प्राप्त होण्यासाठी रुपेश बोराडे सर आणि जयश्री गुंड मॅडम् यांचे मार्गदर्शन लाभले.

praman025_1  H  
 
रुपेश बोराडे यांनी यापूर्वी देखिल जिल्हा परिषद शाळेतील तीन विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत आणलेली आहेत.