आता बाजरीची भाकरी ठरतेय कोरोनावर उपयुक्त, जाणून घ्या फायदे

जनदूत टिम    05-Oct-2020
Total Views |
मुंबई : सहा महिन्यांपासून आपला देश कोरोनाशी लढत आहे. यावर अनेक औषधे आली मात्र रुग्णसंख्या अजूनही कमी होताना दिसत नाही. मात्र आता आहारातील काही गोष्टी या रोगावर फायदेशीर ठरत आहेत.
 
bajrichi-bhakrप_1 &n
 
आपल्या आहारातील काही गोष्टी बदलल्या तर त्या देखील कोरोनावर उपयुक्त ठरत आहेत. सध्या आपल्या आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या धान्‍याचा वापर कमी झाला आहे. ही पिके आरोग्यासाठी महत्त्वाची असून, त्यातील बाजरी या धान्याचे फायदे अधिक आहेत. कोरोनाच्या व्‍हायरसवर बाजरीची भाकरी देखील उपयुक्‍त आणि कोरोना आजारावर गुणकारी ठरत आहे. एकेकाळी कोरडवाहू पिकांमध्ये बाजरी हे महत्त्वाचे पीक होते. आहारात बाजरीचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर होत होता.
 
बाजरीच्या दाण्यात आर्द्रता अठरा टक्‍क्‍यांपर्यंत असते. याशिवाय कर्बोदके २५ टक्के, फायबर १७ टक्के, प्रथिने २२ टक्के, उष्मांक ७५६ किलो कॅलरीज, जीवनसत्त्व बी ६ – ७६८ मायक्रो मि.ली, जीवनसत्त्व ई १०० मायक्रो मि.लि, कॅल्शियम १६ मि.लि, लोह ६ मि.लि, मॅग्नेशियम २२८ मि.लि. ग्रॅम असते. याचा आपल्या शरीराला फायदा होतो.
 
बाजरी ही उत्तम ऊर्जा स्रोत असून, त्यात गहू व तांदूळ यापेक्षा अधिक ऊर्जा असते. प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, जीवनसत्त्व बी ६ अधिक प्रमाणात आहेत. बाजरीमध्ये काही घटकांमुळे शरीरातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. परिणामी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
 
बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम यांचे प्रमाण जास्त असून, त्यामुळे रक्तपुरवठा नियमित होण्यास मदत होते. बाजरीमध्ये फायबर अधिक असून, ते पचनक्रियेसाठी मदत करतात. यामुळे अनेक प्रकारे बाजरी गुणकारी आहे. सर्वात महत्त्वाचे बाजरीची भाकरी कोरोनावर गुणकारी ठरत आहे. ‘डब्‍ल्यूएचओ’ने नुकताच स्पष्ट केले आहे की, कोरोनाच्या काळात गरम वस्तू खाणे कधीही फायद्याचे आहे. त्यामुळे आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्या पाहिजे. यात काही तंज्ञ डॉक्टरांच्या मते बाजरी खाणाऱ्या माणसाला सहसा कोरोना होत नाही.
 
खेड्यातील बाजरी खाणारे लोक हे आरोग्याच्या बाबतीत उत्तम असतात. बाजरीची भाकरी फायद्याची असली तरी आपण अजूनही कोरोना काळात काळजी घेतली पाहिजे. सर्वच गोष्टी पाळल्या तर आपण कोरोनावर सहज मात
करू शकतो.