चिराग फलोर जेईई अॅडव्हान्स परीक्षेत देशात अव्वल

जनदूत टिम    05-Oct-2020
Total Views |
नवी दिल्ली : जेईई अॅडव्हान्स परीक्षेत ४३ हजार २०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुंबई झोनमधून चिराग फलोरने देशात चमकदार कामगिरी केली. ‘बाल पुरस्कार प्राप्त असलेला माझा मित्र चिराग फलोरला भेटा. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गणित व विज्ञान स्पर्धांचा तो विजेता आहे. खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र या विषयात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. चिरागचे भविष्य उज्ज्वल आहे आणि मी त्याला यशासाठी शुभेच्छा देतो.’ असे ट्वीट चिरागच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ जानेवारीला केले होते.
 
Narendra-Modi-Chirag-Falo
 
चिराग फलोर याचा जन्म २६ ऑगस्ट २००२ रोजी झाला. त्याला विज्ञान आणि खगोलशास्त्राची आवड आहे. अमेरिकन गणित स्पर्धेत (एएमसी-१०) २०१९ मध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त करुन त्याने देशाची मान अभिमानाने उंचावली होती. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेतही त्याने प्रशंसनीय कामगिरी केली होती. हंगेरीतील केजेथेली येथे २०१९ मध्ये आयोजित अॅस्ट्रॉनॉमी आणि अॅस्ट्रोफिजिक्स ऑलिम्पियाड स्पर्धेत त्याने भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात त्याला बालशक्ति पुरस्कार २०२० ने सन्मानित करण्यात आले होते.
 
IIT मुंबई झोनमधून चिराग फलोर याने सामान्य श्रेणीत पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याला ३९६ पैकी ३५२ गुण मिळाले आहेत. तर कनिष्का मित्तल या विद्यार्थिनीने सामान्य श्रेणीत १७ वा आणि महिलांच्या यादीत पहिला येण्याचा मान मिळवला. तिला ३९६ पैकी ३१५ गुण मिळाले आहेत.