कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना करोनाची बाधा

जनदूत टिम    29-Oct-2020
Total Views |
शुक्रवुारी दिलीप वळसे पाटील यांचा वाढदिवसही आहे राज्यातल्या सुमारे १५ ते १६ मंत्र्यांना करोनाची बाधा झाली त्यात आता दिलीप वळसे पाटील यांचाही समावेश झाला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उद्या म्हणजेच

Dilip_1  H x W: 
 
नुकतीच माझी करोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून करोनाची चाचणी करून घ्यावी. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी बरा होईन आणि पुन्हा महाराष्ट्राच्या सेवेत रुजू होईन असंही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही करोनाची बाधा झाली. त्यांच्यावर ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
दरम्यान याआधी जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, बच्चू कडू, हसन मुश्रीफ, नितीन राऊत, एकनाथ शिंदे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधल्या सुमारे १५ ते १६ मंत्र्यांना करोनाची बाधा झाली. ते बरेही झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांना कोरनाची बाधा झाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.