अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान संस्थेचा गरजूंसाठी दिवाळी फराळ वाटप उपक्रम

जनदूत टिम    29-Oct-2020
Total Views |
प्रतिनिधी महेश्वर तेटांबे यांस कडुन अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान गेल्या ११ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील हीं सेवाभावी संस्था महाराष्ट्रातील आदिवासी पाड्यांमध्ये गरजवंताना मोफत दिवाळी फराळ वाटप करणार आहे.

Akshara_1  H x  
 
कोरोना सारख्या विषाणू महामारी मुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटात शहरातील समाज देखील आपल्या कुटुंबासाठी दिवाळी फराळ करू शकेल की नाही अशी स्थिती आहे म्हणूनच ही संस्था महाराष्ट्रातील ठराविक आदिवासी पाड्यांवर व शहरी भागातील जवळ जवळ २५० ते ३०० कुटुंबांना मोफत दिवाळी फराळ वाटप करण्याचा संकल्प करत आहे.
 
संस्थेच्या या सामाजिक उपक्रमात आपणही सहभागी होऊन काही कुटुंबांची दिवाळी नक्कीच गोड करू शकता आपण जर या उपक्रमास सहकार्य करू इच्छित असाल तर कृपया आपण आपली मदत थेट संस्थेच्या www.aksharasp.org या संकेत स्थळावर भेट देऊन करू शकता जेणेकरून आपणास ८० Gसर्टिफिकेट मिळू शकेल. असे संस्था आपणास आवाहन करीत आहे.