डॉ. संजय दुधे यांची नागपूर विद्यापीठाच्या प्र कुलगुरुपदी नियुक्ती

जनदूत टिम    28-Oct-2020
Total Views |
नागपूर : नागपूर विद्यापीठाच्या प्र कुलगुरुपदी डॉ. संजय दुधे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षांचे वेळेवर निकाल लावण्याचं दुधेंसमोर मोठं आव्हान आहे. विशेष म्हणजे बऱ्याच दिवसांनी विद्यापीठाला पूर्णवेळ प्र कुलगुरु मिळाले आहेत. तसेच डॉ. संजय दुधे शिक्षक मंचाचे सक्रिय कार्यकर्तेसुद्धा आहेत.

sanjay Dudhe_1   
 
नागपूर विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा ८ ऑक्टोबरपासून सुरू झाली होती. पण ९ ऑक्टोबरला डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट या विषयाचा पेपर आयोजित करण्यात आला असता विद्यापीठाच्या ऑनलाईन अॅप सर्व्हरमध्ये तांत्रिक गडबड होऊन तो डाऊन झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता. यानंतर ही परीक्षा पुढे ढकललण्यात आली होती. जवळपास ७० हजारांहून अधिक विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेसाठी बसले होते. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांच अशा प्रकारे ऑनलाईन परीक्षा घेतली जात होती. त्यामुळे नागपूर विद्यापीठासह विद्यार्थ्यांसमोरही तांत्रिक बाजू सांभाळण्याचं मोठं आव्हान होतं.
 
दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला होता. त्यामुळे ऐन परीक्षेत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ६ ऑक्टोबर आणि ७ ऑक्टोबर २०२० रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षेच्या तारखा लवकरच ठरवून त्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि आयडॉलच्या लिंकवर प्रदर्शित केल्या जातील, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या उपकुलसचिवांनी दिली होती.