राशी स्टुडिओ लोगो अनावरण आणि देवां तुला शोधू कुठे लघुपटाचा प्रकाशन सोहळा

22 Oct 2020 13:17:14
मुंबई : परळ लालबाग म्हंटलं की कामगार वर्ग आलाच अशा या गजबजलेल्या कामगार वस्तीत अद्यावत असलेला आणि कामगार वर्गातील कलाकारांच्या खिशाला परवडणारा अशा यां राशी स्टुडिओचे नूतनीकरण नुकतंच पार पडलं असून त्याचं औचित्य साधून करिरोड येथील राशी स्टुडिओ मध्ये राशी स्टुडिओच्या लोगोचे अनावरण आणि पारंबी प्रॉडक्शन निर्मित आणि अक्षय वास्कर दिग्दर्शित देवां तुला शोधू कुठे या लघुपटाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला.
 
Natya_1  H x W:
 
याप्रसंगी प्रमुख अतिथि प्रसिद्ध अभिनेत्री संजीवनी पाटील (वछ्छी) - मालिका - रात्रीस खेळ चाले, अभिनेता सुरेश डाळे, दिग्दर्शक-पत्रकार महेश तेटांबे, रसिका थिएटर चे सर्वेसर्वा आबा पेडणेकर, प्रसिद्ध सूत्र संचालक दिव्येश शिरवाडकर, दिग्दर्शक गणेश तळेकर, राशी स्टुडिओचे संचालक राकेश शेळके आणि शितल माने, निर्माती चंद्रकला प्रकाश वासकर, संकलक क्षितिज लादे व श्वेता लादे, लेखक सनीत मालुसरे, महिला उद्योजिका सौ.स्वप्नाली सचिन देशमुख, सचिन देशमुख, सौ.पुनम रणजित देशमुख, छायाचित्रकार अनमोल चव्हाण, संकलक कुणाल बने, संगीतकार मंदार पाटील, रंगभूषाकार मनिषा पाटील गीतकार यज्ञेश दौड, कार्यकारी निर्माता सागर सुरलकर तसेच सिने क्षेत्रांतील आदी मान्यवर उपस्थित होते.
 
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपापल्या परीने शुभेच्छा दिल्या. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या उदार भावनेने प्रेरीत होऊन निर्माता दिग्दर्शक अक्षय वास्कर यांनी देवां तुला शोधू कुठे या लघुपटाची निर्मिती करुन आपल्य़ा कुशाग्र दिग्दर्शनातून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या लघुपटाला आतापर्यंत अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण भारतात १२८ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत़. देवप्राप्ती हे उचित ध्येय गाठण्यासाठी ध्येयवेडा मुलगा आपल्य़ा प्रयत्नांची पराकाष्ठा करुन आपलं ध्येय कसं साध्य करतो आणि त्यांत त्याला कशाप्रकारे यश मिळते हे या कथेत मांडले आहे.
 
येत्या विजयादशमी च्या मुहूर्तावर हा लघुपट MX play, Shemaroo Me, Hangama paly, Airtel Xstream, Vi Movies आणि TV JioCinema या प्रसिद्ध अशा OTT माध्यमांतुन प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे असे आवाहन दिग्दर्शक अक्षय वास्कर यांनी केले आहे. त्याचबरोबर राशी स्टुडिओचे संचालक राकेश शेळके आणि शितल माने आणि दिग्दर्शक अक्षय वास्कर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानून यां सोहळ्याची सांगता केली.
Powered By Sangraha 9.0