कांद्याचे भाव वाढले म्हणून सर्वसामान्य माणसाने बोंबलू नये - बच्चू कडू

जनदूत टिम    21-Oct-2020
Total Views |
अमरावती : कोरोनामुळे आर्थिक अडचण त्यात अस्मानी संकट आणि वाढलेली महागाई यामुळे नागिरक चिंतेत आहेत. अशातच ‘कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका. जर परवडत नसेल तर लसूण आणि मुळा खा’ असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते.
 
kadu_1  H x W:
 
केंद्र सरकारने इराणमधून नुकताच कांदा आयात केल्याने संपूर्ण देशासह राज्यात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र, कांद्याचे भाव वाढले म्हणून सर्वसामान्य माणसाने बोंबलू नये असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. तर कांदाचे भाव वाढले पाहिजे कारण ७० वर्षाचा अनुशेष आहे. ज्यांना कांदा परवडत नसेल त्यांनी मुळा, लसूण खावा असं बच्चू कडू म्हणालेत.
 
‘आता मीडियाने सुद्धा गृहिनीचं बजेट कोलमडलं असं सांगू नये’ ज्यांना असेही यावेळी कडू यांनी सांगितले. मात्र, हा कांदा शेतकऱ्यांचा नसून आयात केलेला कांदा आहे. मग आयात केलेल्या कांद्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल असा प्रश्न यावेळी त्यांनी विचारला आहे.
 
खरंतर, गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले असताना आता सामान्यांना कांद्याच्या दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. मुंबई महानगरात कांद्याच्या किरकोळ दराने ७०-९० रुपयांवर झेप घेतली, तर पुणे परिसरात तो ५० ते ७० रुपयांच्या घरात पोहोचला. राज्य सरकारने हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी दिल्यामुळे कांद्याच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे लवकरच कांदा शंभरी गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास सामान्य लोकांच्या घरातील बजेट कोलमडू शकते.
 
उन्हाळी कांद्याचा साठा संपत चालला असून अतिवृष्टामुळे खरिपाच्या कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचे नवीन पीक येण्यास विलंब लागेल. परिणामी देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी ७०५ टन कांद्याची आवक झाली असून घाऊक बाजारातच कांद्याचा प्रतिकिलो दर ४० ते ७० रूपयांवर जाऊन पोहोचला आहे.