उमेश पिसाळ यांच्या वतीने शाशनकृत शिबिराचे आयोजन

जनदूत टिम    19-Oct-2020
Total Views |
कल्याण : भाजपा कल्याण शहर उपाध्यक्ष उमेश पिसाळ यांनी त्यांच्या रामदास वाडी,वार्ड क्र.२५ येथील जनसंपर्क कार्यालयात दिनांक १५ ऑक्टोबर पासून नागरिकांसाठी पाच दिवसीय आयुष्यमान भारत योजना,महात्मा फुले जन आरोग्य योजना तथा जनधन योजना शिबीर आयोजित केले आहे .
 
Umesh Pisal_1  
 
आरोग्यम् धनसंपदा या उक्तीप्रमाणे प्रत्येकाचे आयुष्य सुदृढ व निरोगी हवे मात्र मानवाच्या प्रगतीबरोबर दिवसेंदिवस नवनवीन आजारही वाढत आहेत मात्र गोरगरीब आर्थिक दुर्बल रुग्णांना आजारांवरील उपचाराचा खर्च महागाईमुळे परवडत नाही. कमाई कमी आणि आजारांवरील उपचाराचा खर्च जास्त त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
 
हे लक्षात घेता गोरगरिबांना आजारपणात उपचारांसाठी आर्थिक आधार मिळावा उपचाराअभावी रुग्णांची हेळसांड होऊ नये या हेतूने उमेश पिसाळ यांनी या शिबिराचे आयोजन केले . त्या शिबिरास शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे , श्याम मिरकुटे, निखिल चव्हाण , डॉ राजु राम, एड. शिल्या राजु राम ,आणि प्रकाश पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.