पुळूज गावातील पूर बाधित लोकांना पं स सदस्य मुबीनाताई मुलानी यांच्या कडून मदत वाटप

जनदूत टिम    19-Oct-2020
Total Views |
सोलापूर : महाराष्ट्रातील पहिल्या पंचायत समिती सदस्य ज्यांनी स्वतःच्या स्वखर्चातून जे पुळूज गावावर संकट कोसळलं होतं पुराच्या पाण्यामध्ये पुळुज गावांमधील जवळ-जवळ एकशे पंचवीस कुटुंब ही स्थलांतर करण्यात आली होती त्या कुटुंबाला कुठेतरी मदत मिळणे गरजेचे होती त्यावेळेस इथल्या सर्वसामान्य गोरगरीब माणसासाठी पुळुज गणाच्या पंचायत समिती सदस्य मुबीना ताई मुलाणी यांनी जीवनावश्यक वस्तूची किट वाटप करण्यात आले.

Puluj_1  H x W: 
 
किट मधील वस्तू १) शेंगदाणे १कि. २) तुरडाळ १कि. ३) केशर तेल१कि. ४) तांदूळ २कि. ५) आटा पिठ ५कि ६) चाहापुडा १ ) ७) अंबारी चटणी १पाकीट ८) एवरेस्ट मसाला १ पाकीट ९) कोलगेट टूब इत्यादी वस्तू या किटमध्ये देण्यात आल्या या किटचे वाटप या भागाचे नेते विनोद जी मालक महाडिक साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
 
यावेळी या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य मुबिना ताई मुलानी पै अफसर शेख राजारामजी बाबर पांडुरंग ताटे सलीम मुलानी धनाजी देशमुख माणिक बाबर भारत पाटील मधुकर बाबर संदीप देवकाते शिवाजी शेंडगे पिनू भोसले मोठ्या संख्येने ग्रामस्थ होते.