भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांना हृदयविकाराचा झटका

जनदूत टिम    19-Oct-2020
Total Views |
उस्मानाबाद : समय सारथी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषदेतील मुख्य प्रतोद आमदार सुजितसिंह ठाकूर यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने सोलापूर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चांगली आहे.
 
sujitsingh2_1  
 
आमदार ठाकूर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्या नंतर त्यांनी त्यावर मात केली होती व त्याच दमाने आणि जिद्दीने शेतकऱ्यांचे, जनतेचे प्रश्न सोडविण्यासह कोरोना काळात संसर्ग वाढू नये यासाठी काम सुरु केले होते. आमदार ठाकूर यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवत असल्याने त्यांना तात्काळ सोलापूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले.
 
तज्ञ डॉक्टर यांच्या सल्ल्यानुसार त्यांना अँजिओग्राफी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार अँजिओग्राफी व पुढील उपचारासाठी ते मुंबई येथे जाणार आहेत अशी माहिती दत्ता कुलकर्णी यांनी दिली.