भिवंडी तहसीलदार पदी अधिक पाटील यांची नियुक्ती, मावळते तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी सोपवला पदभार

जनदूत टिम    19-Oct-2020
Total Views |
भिवंडी : भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त पदावर अधिक पाटील यांची भिवंडी तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे. शशिकांत गायकवाड यांनी अधिक पाटील यांना पदभार सुपूर्त केला आहे.

bhiwandi_1  H x 
 
पत्रकार सुरक्षा समिती, भिवंडी, महाराष्ट्र राज्य, तथा कोकण विभाग पत्रकार संघ, मुंबई उप -जिल्हा अध्यक्ष असेच दैनिक बातमीदार चे ठाणे ज़िल्हा मुख्य प्रतिनिधी अरुण (अरविंद )पाटील यांनी आपल्या संघटने तर्फे नव नियुक्त तहसीलदार पाटील व मावळते तहसीलदार गायकवाड यांना पुष्प गुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.