२७ गावातील समस्या सोडवण्यासाठी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी घेतली ग्रामस्थांसह केडीएमसी आयुक्तांची भेट

जनदूत टिम    17-Oct-2020
Total Views |

- कचरा, नादुरुस्त रस्ते आणि पाणी प्रश्न तातडीने सोडवा - अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील
- समस्यांवर तातडीने सोडवायचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांचे आश्वासन

कल्याण : कल्याण-डोंबिवली मधील २७ गावांमध्ये सध्या नागरी समस्यांचा बोजवारा उडाला आहे. पाणी , नादुरुस्त रस्ते आणि नियमितपणे नुचलला जाणारा कचरा यांमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सुरू उमटले होते.त्यामुळे नगरसेवक कुणाल पाटील यांनी केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांची भेट घेत समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे.
 
kalyan556640_1  
 
कल्याण डोंबिवली मधील २७ गावांची विभागणी झाल्यापासून कल्याण डोंबिवली महापालिकेने सुविधा पुरवण्याचे कमी केले आहे. त्यामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत.सततच्या अपघातांना वाहनचालक देखील कंटाळले आहेत.तर गावांमध्ये कमी दाबाने होत असलेला पाणीपुरवठा यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.त्यामुळे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी आयुक्तांची भेट घेत समस्यांचा पाढा आयुक्तांसमोर मांडला आहे.
 
आयुक्तांनी देखील पाटील यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने लक्ष घालून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे २७ गावातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असून पाणी , कचरा आणि रस्त्यांवरील खड्डे अश्या समस्या तातडीने सोडवणार असल्याचे आयुक्तांची सांगितले आहे.या वेळी २७ गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष विजय भाने, मा.सरपंच बळीराम भाने, वासुदेव गायकर, दिलीप दाखिनकर प्रदीप गुप्ता आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
 
अफवांवर विश्वास ठेवू नका- आयुक्त विजय सूर्यवंशी
२७ गावांमध्ये या पूर्वी झालेली बांधकामे तोडण्यासाठी आणि पाहण्यासाठी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी भेट दिल्याची अफवा गावांमध्ये पसरवली होती.मात्र मी गावांमध्ये प्लॅन पास संदर्भात इमारतींची आणि जागांची पाहणी करण्यासाठी आलो असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.त्यामुळे २७गावातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन कुणाल पाटील यांनी केले आहे.