फी सक्ती करणाऱ्या इंग्रजी शाळेला दणका

अक्षय शिंदे    17-Oct-2020
Total Views |

आंदोलना मुळे शाळा अखेर नमली

कल्याण : कोरोना काळात अनेकांच्या उत्पन्ना वर परिणाम झाला असताना शाळा विद्यार्थ्यांना फी भरण्याची सक्ती करीत आहेत.अश्याच एका कल्याण पूर्वेतील इंग्रजी शाळेच्या फी भरण्याच्या सक्तीच्या विरोधात शिवसेना नगरसेवकाने पालकांना घेऊन आंदोलन केले.
 
Kalyan andolan_1 &nb
 
४० मिनिटाच्या लेक्चरला शाळा पूर्ण फी मागत असल्याने शेवटी या शाळेच्या विरोधात आंदोलनाच्या दणक्या मुळे शाळेने नमते घेत ३५ टक्के फी माफ करीत पालकांना दिलासा दिला. कल्याण पूर्वेत साई इंग्लिश स्कुल ही विनाअनुदानित इंग्रजी शाळा कोरोना काळात अनेकांचे उपन्न बंद असताना पालकांन कडे विद्यार्थ्यांची फी भरण्या साठी तगदा लावत होती.
 
फी भरण्या साठी सक्ती होत आल्याने या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याणच्या पालकांनी या बाबत कल्याण पूर्वेचे नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कडे गाऱ्हाणे मांडले होते.या पालकांच्या तक्रारी नंतर नगरसेवक गायकवाड यांनी शाळे कडे पालकांना घेऊन मोर्चा वळवीत शाळेला जाब विचारला असता शाळेने नमते घेतले.
 
या शाळेच्या फी बाबत आंदोलना मुळे साई इंग्लिश स्कुलच्या संचालिका गौतमी मैथिली यांनी नगरसेवक महेश गायकवाड व जमलेल्या पालकांन बरोबर बोलणी करीत फी मध्ये ३५ टक्के सूट देण्याचे मान्य केले कोरोना संकट असल्याने पालकांच्या उपन्नावर परिणाम झाल्या मुळे शाळेने नमते घेत शाळा ३५% फी माफ करीत असल्याचे घोषित केल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.