नवरात्री २०२०: जाणून घ्या नवरात्रीच्या नऊ रंगांचे महत्त्व

जनदूत टिम    16-Oct-2020
Total Views |
नऊ दिवसांचा नवरात्रींचा सण (navratri festival 2020) अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. आईच्या आगमानाने देवी पक्षाला सुरूवात होते. दरम्यान, यंदा अधिक मास (adhik maas) आल्याने हा सण महिनाभर उशिराने आला. पितृपक्ष संपल्यानंतर लगेचच घट बसतात आणि नवरात्रीला सुरूवात होते.
 
Navratri__1  H
 
मात्र यंदा अधिक मास असल्याने पितृपक्ष (pitru paksh) संपल्यानंतर तब्बल एक महिन्यांनी घट बसत आहे. मात्र असे असले तरी तितक्या भक्तीने आणि तन्मयतेने देवीचे स्वागत केले जाणार आहे. यंदा या उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने बऱ्या च ठिकाणी नवरात्रीच्या दांडिया रासचा कार्यक्रम रद्द केला जाऊ शकतो. दरम्यान, अनेक जण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात.
या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सणांची उधळण.
 
नवरात्रीचे नऊ दिवस विविध रंग परिधान केले जातात. या नऊ दिवशी विविध रंगांच्या साड्या देवी माताला नेसवल्या जातात. तसेच सगळेच त्या त्या रंगांचे कपडे त्या विशिष्ट दिवशी घालतात. जाणून घ्या यंदाच्या नवरात्रीचे नऊ रंग आणि त्यांचे महत्त्व
 
१७ ऑक्टोबर, राखाडी, घटस्थापना : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटाची स्थापना केली जाते. यालाच घटस्थापना म्हणतात.नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीच्या शैलपुत्री अवताराची पुजा केली जाते. राखाडी हा रंगाचे वैशिष्ट्य म्हणजे वाईट गोष्टींचा नाश.
 
१८ ऑक्टोबर, नारंगी, द्वितीया : नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रम्हचारिणी या रूपाची पुजा केली जाते. नारंगी हा रंग शांतता, ज्ञानाचे प्रतीक आहे.
 
१९ ऑक्टोबर, पांढरा, तृतीया : याला नवरात्रीची तिसरी माळ म्हणतात. या दिवशी चंद्रघटा या देवीची पुजा केली जाते. पांढरा रंग शांतता, निर्मळ, शांतता, पवित्रतेचे प्रतीक आहे.
 
२० ऑक्टोबर, लाल, चतुर्थी : नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुशमंदा देवीच्या रूपाची पुजा केली जाते. लाल हा रंग आवड,शुभ आणि रागाचे प्रतीक आहे.
 
२१ ऑक्टोबर, रॉयल ब्लू, पंचमी : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी भक्त स्कंदमाता या देवीच्या रूपाची पुजा केली. निळा रगं हा उर्जेचे प्रतीक मानला जातो.
 
२२ ऑक्टोबर, पिवळा, षष्ठी : नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कातयानी देवीची पुजा केली जाते. पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो.
२३ ऑक्टोबर, हिरवा, सप्तमी : नवरात्रीच्या सातव्या दिवशी कलातरी देवीच्या रूपाची पुजा केली जाते. हिरवा रंग हा निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला जातो.
 
२४ ऑक्टोबर, मोरपंखी, अष्टमी : नवरात्रीच्या आठव्या दिवशी गौरी देवीची आराधना केली जाते. हा रंग इच्छाशक्ती तसेच ध्येयपूर्तीचे प्रतीक मानला जातो.
 
२५ ऑक्टोबर, जांभळा, नवमी : नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धीधात्री देवीची पुजा अर्चा केली जाते. जांभळा रंग हा महात्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक असतो.