जिल्हा परिषदेच्या नर्सरी शिक्षिका व मदतनीस करणार आमरण उपोषण

पारस सहाणे    15-Oct-2020
Total Views |
जव्हार : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे ज्ञान मिळण्यासाठी जिल्हा परिषदेने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केलेल्या आहेत.
 
Mokhad_1  H x W
 
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मानधनावर काही महिला शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोखाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे घडे नर्सरी शिक्षिका व मदतनीस अत्यंत प्रामाणिकपणे व कमी मानधनावर देत आहेत. मात्र गेल्या १० महिन्यांपासून सदर शिक्षिका व मदतनीस यांना पगार मिळत नसल्याने त्यांनी आमरण उपोषणाची नोटीस पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली आहे.
 
सर्व शिक्षिका नर्सरी शिक्षिका व मदतनीस सन २०१० या शैक्षणिक वर्षापासून ते आजपर्यंत पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमच्या अध्यापनाचे कार्य करीत आहेत मात्र त्यांना मिळणाऱ्या मानधनावर ते प्रामाणिकपणे काम करतात कमी पगार व त्यातच घरची हलाखीची परिस्थिती त्यामुळे आर्थिक अडचणींचा डोंगर त्यांच्यासमोर उभा राहिला आहे सर्व शिक्षक शिक्षिका व मदतनीस यांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी पालघर पर्यंत सर्व कार्यालयाचे उंबरठे झिजवले मात्र त्यांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही वारंवार पत्रव्यवहार केला मात्र आजतागायत त्यांची दखल पालघर जिल्हा परिषद घेतली नाही माहे जून २०१९ पासून ते एप्रिल २०२० पर्यंत १० महिन्यांचे मानधन त्यांना अजूनही मिळू शकले नाही.
 
दिनांक ०५ /०८/ २०२० रोजी त्यांनी उपोषणास बसण्या संदर्भात पत्र .पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते. परंतु ०६ /०८/ २०२० रोजी जिल्हा परिषदेने त्यांना मानधन देण्या संदर्भाचे पत्राद्वारे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले परंतु त्या त्यानंतरही दोन महिने पूर्ण झाले तरी अजून कोणत्याही प्रकारची योग्य ती कारवाई झाली नाही. त्यामुळे पगार नसल्याने उपासमारीची वेळ सदर गरीब नर्सरी शिक्षिका व मदतनीस कर्मचाऱ्यांसमोर उभी राहिली आहे.
 
न्याय मिळत नसल्याने त्यांनी पुन्हा १७ ऑक्टोबर रोजी पर्यंत वेतन न मिळाल्यास सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजीपासून जिल्हा परिषद पालघर कार्यालयासमोर शासनाच्या सामाजिक अंतराची नियम पालन करून सर्व शिक्षिका व मदतनीस बेमुदत आमरण उपोषण करणार आहे असा इशारा नर्सरी शिक्षिका व मदतनीस यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला आहे.