योग योगेश्वर संस्थांचा उपक्रम अत्यंत उल्लेखनीय : आ रणधीर सावरकर

जनदूत टिम    15-Oct-2020
Total Views |
सोलापूर : आ. रणधीर भाऊ सावरकर यांनी योग योगेश्वर संस्थानमधील भागवत कथेला सदिच्छा भेट दिली असून वरुर जऊळका गावातील शुभम कात्रे या मुलाने कोरोणाच्या काळाचा फायदा घेऊन जुन्या राजदूत गाडीचे फक्त तीस हजार रुपयांमध्ये ट्रॅक्टर बनवलेला असून पूर्ण महाराष्ट्रात त्या मुलाचे कौतुक करणे चालू आहे. संस्थानच्या वतीने श्री आमदार रणवीर भाऊ सावरकर यांच्या हस्ते शुभम कात्रे व पिंटू भाऊ काठोळे यांना कोरूना योद्धा पुरस्कार देण्यात आला.

yog Sanstha_1    
 
सावरकर साहेबांनी योग योगेश्वर संस्थान अंतर्गत पोलीस अधीक्षक, डॉक्टर्स ,आशा वर्कर, पत्रकार यांना संस्थांनी पुरस्कार दिला असून हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे कारण कोरोना काळामध्ये या मंडळींची कामगिरी फार मोलाची ठरलेली आहे आणि म्हणून जनतेने यांना सहकार्य करणे अतिशय गरजेचे आहे सरकारी दवाखान्यातील डॉक्टर व इतर डॉक्टर यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अविरत हे कार्य चालू ठेवले यामध्ये पोलिसांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे कोरोनाची स्थीती काय आहे हे कळेना करिता पत्रकार मंडळी जीवाची बाजी लावून ह्या सर्व बातम्या आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे आणि म्हणून या सर्व मंडळींचा उत्साह याहीपुढे कायम असाच टिकून रहावा याकरिता योग योगेश्वर संस्थान मधे शेटे महाराजांच्या माध्यमातून कोरोना युद्धा पुरस्काराची संकल्पना अगदी स्तुत्य आहे .
 
आम्ही वारकरी संप्रदायाचे पाईक असून शेटे महाराजांच्या सोबत धर्म कार्याकरिता सदैव तत्पर आहोत . संस्थान मधील कार्यक्रमातील शिस्त , शांतता, स्वच्छता, प्रसन्नता व भक्त मंडळींची नम्रता पाहून मी भारावून गेलेला आहो.कोरोना अजून संपलेला नाही आणि म्हणून येत्या दसऱ्याच्या दिवसाला एकामेकाच्या घरी पाया पडायला जायची प्रथा या वर्षा पूर्ती थांबून दसऱ्याच्या दिवसाला आपल्या घरीच वडीलधाऱ्या मंडळींचे दर्शन घ्यावे . सध्या बाहेर राज्यातील कामगार आता महाराष्ट्रामध्ये लवकर परत येणार नाही म्हणून महाराष्ट्रातील तरुण मंडळींना कामाची चांगली संधी चालून आलेली आहे म्हणून तरुणांनी इतरत्र वेळ वाया न घालवता संधीचे सोने करावे असे मनोगत सावरकर साहेबांनी व्यक्त केले. संस्थानच्या वतीने आमदार रंधीर भाऊ सावरकर, डॉ राजूभाऊ नागमते, अशोक भाऊ गावंडे ,संदीप भाऊ उगले, उमेश भाऊ पवार यांना कोरणा योद्धा पुरस्कार देण्यात आला.
 
सत्काराच्या कार्यक्रमाला चेतन भाऊ डोईफोडे, विनोद भाऊ ईसेकार ,हरिभाऊ आवारे, बच्चुभाऊ वानखडे, काशिनाथ भाऊ हिंगनकर, राजेंद्र भाऊ गवई, डॉ वानखडे, बाळू सोनटक्के, वसंता शेटे, रतन पाटील वानखेडे, रामेश्वर महाराज गाढे, विलास म कराड, सागर म गायकवाड, विक्रम म शेटे, सोपान म ऊकर्डे, कुचेकर भाऊ, रवी शेटे, गोविंदा पांडव, गोपाल वरहीकर, तेजस रामेकर आदी मान्यवर उपस्थित होते.