दोन दिवसांत १००० रुपयांनी स्वस्त झालं सोनं

जनदूत टिम    15-Oct-2020
Total Views |
मुंबई : सोनं-चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण कमोडिटी एक्सचेंज एमसीएक्सवर सोने आणि चांदीच्या किंमती पुन्हा एकदा घसरल्या आहेत.
 
gold-ufhgggg-1_1 &nb 
 
अमेरिकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांआधी काही अनुदानपर घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. एमसीएक्सवर, आज सुरुवाती बाजारात डिसेंबरच्या सोन्याचा वायदा भाव ०.४ टक्क्यांनी कमी होत ५०,३६० प्रति १० ग्रॅमवर आला आहे तर डिसेंबरच्या चांदीचा वायदा भाव ०.९ टक्क्यांनी घसरत ६१,०६४ प्रति किलोग्रॅमवर आला आहे. मागच्या सत्रात सोन्यामध्ये ०.५ टक्क्यांनी घसरण झाली आहे चांदीने १.६ टक्क्यांनी उडी घेतली आहे. जागतिक बाजारात, आजा सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकी डॉलरमुळे आज सोन्यावर दबाव होता.
डॉलर इंडेक्स ९३.४३५ च्या उच्च स्तरावर पोहोचला आहे.
 
परदेशी बाजारात सोनं ०.४ टक्क्यांनी घसरून १,८९३.१७ डॉलर प्रति औंसवर गेलं आहे. तर इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी १ टक्क्यांनी घसरत २४.०५ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. प्लॅटिनम ०.३ टक्क्यांनी घसरत ८५४.५९ डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे. मोतीलाल ओसवाल फायनेंशिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सोनं डिसेंबरच्या वायदा भावात ५०,१०० रुपयांनी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ४९,९०० रुपयांवर स्टॉपलॉस ठेवा आणि एक ते दोन सत्रांमध्ये ५०,७०० रुपये प्रति १० ग्रॅम असं सोनं खरेदी करा. चांदीही डिसेंबरच्या वायदा भावामध्ये ६०,७५० रुपये दराने खरेदी करा.
 
६०,२०० रुपयांवर स्टॉपलॉस लावा आणि दोन सत्रांमध्ये ६१,९०० रुपयांनी चांदी खरेदी करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. दरम्यान, आता सोन्याचे भाव जरी कमी असले तरी दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमती मोठ्या झपाट्याने वाढतील. दिवाळीपर्यंत सोनं ५००००-५२००० रुपये प्रति १० ग्रॅम होण्याची शक्यता आहे.