पंढरपूर लक्ष्मी टाकळी गावात विज, आरोग्य तसेच रस्त्याची अवस्था दयनीय

13 Oct 2020 13:27:05
पंढरपूर : पंढरपूर शहरापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या लक्ष्मी टाकळी गावातील आजूबाजूला सुमारे वीस ते पंचवीस उपनगरे वसली असून या उपनगरातील राहणाऱ्या नागरिकांना विज आरोग्य तसेच रस्ता याचा सतत सामना करावा लागत आहे.
 
Pandherpur_1  H
 
उपनगरातील रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून रस्ता पाण्यात पाण्यात रस्ता सध्या अशी अवस्था माऊली नगर हनुमान नगर आदी नगरातून पहावयास मिळते सर्वात मोठी असलेली ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असलेल्या ग्रामपंचायतीत विकासाच्या कामाबाबत मात्र शह-काटशह याचे राजकारण चालू असल्याने त्यांच्या या वागण्यामुळे नागरी सुविधा वर मोठा परिणाम झाल्याचे जाणवत आहे हनुमान नगरचा तर रस्ता हा हनुमान नगर च्या बोर्डा पासून ते कारंडे घरापर्यंत अर्धवट करण्यात आलेला आहे अशीच अवस्था अनेक नगरची आहे पावसाळ्याच्या दिवसात तर नागरिकांना आपण रस्त्यातून चालत चालत जातो की पाण्यातून चालत जातो असा प्रश्न पडला आहे.
 
हे रस्ते मोहन टाकून दुरुस्त करण्याची साधी तसदी सुद्धा या भागातील ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली नाही वास्तविक विकास कामाची जबाबदारी ग्राम विकास अधिकारी अर्थात ग्रामसेवकावर असतानासुद्धा ग्रामसेवक विकासाच्या बाबतीत कमालीचे उदासीन दिसून येत असून तेही राजकारणाच्या हातातील बाहुले बनले अशी शंका उपनगरातील नागरिकांना पडली आहे या उपनगरातील नागरिकांना वर्षानुवर्षे रस्ते आरोग्य याचा सामना करावा लागत आहे याकडे मात्र ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे आता तर उपनगरातील लोक उघड चर्चा करत आहेत की ही उपनगरी नगरपरिषदेने ताब्यात घेऊन या भागाचा विकास करावा त्याशिवाय पर्याय नाही कारण सध्याची अवस्था ग्रामसेवक का पासून ते सदस्य पर्यंत डोळे असून आंधळे असल्यासारखी आहे याला काही सदस्य अपवाद आहेत जे रस्ते अर्धवट आहेत हे रस्ते सिमेंट काँक्रेट ने व ज्या भागात चिखलमय रस्ते आहेत ते रस्ते मुरूम टाकून तातडीने दुरुस्त करावेत व नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी उपनगरातील लोकांची आहे.
Powered By Sangraha 9.0