खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण

जनदूत टिम    01-Oct-2020
Total Views |
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राणेंनी ट्विटरच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली. कोरोनाचा संसर्ग झालेले राणे कुटुंबातील ते दुसरे सदस्य ठरले आहेत.

Narayan-Rane-2_1 &nb 
 
“माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी” असे आवाहन नारायण राणे यांनी ट्विटरवरुन केले आहे. लवकरच लोकसेवेत पुन्हा रुजू होईन, असेही त्यांनी सांगितले.