सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळही घेणार शपथ

28 Nov 2019 13:21:20

सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळही घेणार शपथ

महाविकास आघाडीने नेतेपदी निवडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत.

आज संध्याकाळी मुंबईत शिवाजी पार्कवर हा शपथविधी सोहळा होणार आहे. शिवाजीपार्कवर या सर्व सोहळ्य़ाची जय्यत तयारी सुरु आहे.

आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार का असे विचारताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तो निर्णय उद्धव ठाकरे घेतील असं सांगितलं. उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्र राज्य पुढे घेऊन जाण्यासाठी केंद्राकडून सहकार्य करण्याचं वचन दिल्याचंही राऊत यांनी सांगितलं.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये कोणताही विसंवाद नाही. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचं कालच्या बैठकीत ठरल्याचं राऊत यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

13.30: अजित पवार शरद पवार यांच्य़ा सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेलही तेथे उपस्थित आहेत.

13.20: भाजपानंही बहुमत सिद्ध केलं असतं. जर सर्वोच्च न्यायालयानं 24 तासांची मुदत देण्याची अट घातली नसती तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामे दिले नसते. 24 तासात बहुमत सिद्ध करणं कठिण होतं.

Powered By Sangraha 9.0