नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित विजयी

24 Oct 2019 14:22:54
 
 
विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. नंदूरबार मतदारसंघातून भाजपचे विजयकुमार गावित विजयी झाले आहेत. गावीत यांना एक लाख बारा हजार सातशे त्र्याण्णव मतं मिळाली. राज्यात भाजप शिवसेना महायुती पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सर्व २८८ जागांपैकी २८३ जागांचे कल हाती आले आहेत. भाजप ९९ शिवसेना ६१ काँग्रेस ४१ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ४९ जागांवर आघाडीवर आहे. प्राप्त कलांनुसार १५ जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या आघाडीतील काँग्रेसच्या तुलनेत सरस कामगिरी करताना दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या जागा हा पक्ष कायम राखताना दिसत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0